Pune : शिवसेना अजिंक्य आहे; तुम्ही 2024 मध्ये शिल्लक राहणार नाही; संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा

एमपीसी न्यूज : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभेची (Pune) तयारी सुरु झाली आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने पुण्यातून सुरुवात केली असून आज संजय राऊत यांची पुण्यात सभा सुरु झाली आहे. सभेच्या सुरुवातीलाच महायुती पक्षावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

शिवसेना पुणे शहर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर मेळावा आज रात्री महात्मा फुले मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री शशिकांत सुतार, शिवसेना नेते सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, रघुनाथ कुचिक, पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, बाळा ओसवाल उपस्थित होते. या मेळाव्या दरम्यान ढोल ताशांच्या निनादात शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी स्वागत केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजतेय. कसब्यात काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेच्या मदतीने विजयी झाला. पुणे महापालिकेत 10 नगरसेवकांचे 50 नगरसेवक निवडून आणणार असल्याचे धनवडे यांनी सांगितले.

आज पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना मेळावा भरवण्यात आला असून या मेळाव्याला संजय राऊत संबोधित करत आहेत. यावेळी संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब अमर आहेत, शिवसेना अजिंक्य आहे. शिल्लक शिवसेना काय आहे हे (Pune) पाहण्यासाठी फडणवीस पहा. तुमच्याकडे केवळ कचराच गेलाय. आम्हाला शिल्लक शिवसेना म्हणताय, तुम्ही 2024 मध्ये शिल्लक राहणार नाही.

बाळासाहेब ठाकरे अमर आहेत आणि शिवसैनिक अजिंक्य आहे –

संजय राऊत म्हणाले, कि शिवसेना म्हणजे उसळते महासागर आहे. त्याला कधीच आहोटी लागत नाही. फडणवीस सेना कशी मैदानात उतरली आहे पाहा. या राज्यात ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणता ती शिवसेना सत्तेवर आम्ही आणून दाखवू. ज्यांची सभा यशस्वी होत नाहीत ते आता तिकडं गेले आहेत. ही गर्दी हे विराट रूप बाळासाहेब ठाकरे यांचे आहे.

फडणवीस यांच्या नंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कि मोदी खूप गॅरंटी देतात. आता ही शिवसेनेची गॅरंटी आहे की या पुण्यातून शिवसेनेचे किमान तीन आमदार विधानसभेवर जातील. पुणे लोकसभेचा खासदार भाजपचा नसेल ही आमची गॅरंटी.

WPL 2024: वृंदा दिनेश, काशवी गौतम युवा अनकॅप खेळाडू करोडपती; वुमन्स प्रीमियर लीगमध्ये लिलाव

मी अत्यंत सभ्य माणूस आहे. हजार मारावे आणि एक मोजावे हे मला बाळासाहेबांनी शिकवलं. 2024 नंतर पणवती जाईल काळजी नसावी. 2024 नंतर आपल्या राज्याला आपल्या शिवसेनेला आणि आपल्या देशाला लागलेली पणवती होती जी शंभर टक्के दूर होईल. साडेसाती गेली आहे आता पणवती जाईल असे म्हणत मोदी यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला. आज नरेंद्र मोदी दिसत आहेत ती तर बाळासाहेबांची कृपा असल्याचेही त्यांनी म्हंटले.

अटलजी त्यांना कधीच पदावरून हटवणार होते पण त्यावेळी बाळासाहेब बोलले नरेंद्र मोदी गया तो भाजप गया; पण आता संपूर्ण देश म्हणतोय नरेंद्र मोदी आया तो पुरा देश गया. मोदी परत आले तर लोकशाशी जाईल. आम्हाला वाटलं होतं की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल. आम्हाला मोदींची लाट कुठेच दिसली नाही. उलट लोक चिडलेली आहेत. लोकांच्या मनात संताप आहे, तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही. या देशाची फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या; मग जो काही निकाल लागेल तो संपूर्ण देश स्वीकारेल.

हीच अंधभक्ती देशाला खड्ड्यात घालत आहे. 2024 मध्ये तुम्ही घंटा हॅट्रिक करणार? गेल्या 10 वर्षात दिलेल्या गॅरेंटीचे काय झालं ते सांगा. या देशाचा काळ पैसा जो बाहेर गेला त्याच काय झालं? 15 लाखाचे काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांचे काय झाले. जम्मूत आजही हजारो पंडित बाळासाहेब यांचे चित्र लावून जगतायेत. अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक करणार होते, त्याचे काय झाले, शिवसेनेला घाबरून तुम्ही फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय गुजरातला आणि तेथून ड्रग्स महाराष्ट्रात पुण्यात आणला जात आहे.

पुण्याचं नाव आता बँकॉक होतेय, असे निवेदन जेष्ठ नागरिकांनी पोलिसांना दिले आहेत. हे अड्डे नष्ट करण्यासाठी शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल. शिंदे गटाचे 2 आमदार ड्रग्ज माफियांच्या सोबत आहेत. कालपर्यंत अमित शहा इकबाल मिरचीवर बोलत होते. आता या मिरचीचे काय झाले. त्यांच्या सोबत असलेले प्रफुल्ल पटेल यांचे स्वागत करता, मग नवाब मलिक तुम्हाला का चालत नाही.

60 वर्षांपूर्वी शिवसेनामध्ये ठिणगी टाकली. हे निवडणूक आयोग नव्हे तर मोदी, शहा यांची ही यंत्रणा आहे. तुम्ही आमचं नाव, चिन्ह दिले असेल तर आमचे विराट स्वरूप तुम्हाला झाकता येणार नाही. महाराष्ट्रात 1 आणि दोन हाफ मंत्री आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परखडपणे सांगितले आहे की, 40 आमदार अपात्र आहेत. हे विधानसभा  अध्यक्षांना सुनावले आहेत. त्यांना जल्लादाचे काम करीत आहेत. या विधानसभा अध्यक्षांना कायद्याचे काहीच कळत नाही. माझ्यावर आणखी काही खटला भरत असाल तर परवा नाही. मलाही शिवसेनेत न राहण्यासाठी अनेक प्रलोभने दाखविले. या शिवसेनेसाठी स्वतः बाळासाहेब आणि शिवसैनिक तुरुंगात गेले. हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा आहे. असे अनेक शिंदे येतील आणि जातील पण शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही.

Pune : समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यात डॉक्टरांइतकाच ‘फार्मासिस्ट’चा मोलाचा वाटा-अर्जुन देशपांडे

 

महादेव बाबर म्हणाले, 5 वर्षांत पुणे शहराला लुटण्याचे काम केले. त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांनी साथ दिली. 23 गावे केवळ ‘सोन्याची अंडी’ देणारी कोंबडी म्हणून पाहिले. भाजपने पुणे महापालिका लुटून खालली. पुण्यात आता बदल अटळ आहे. आम्हाला कितीही प्रलोभने दाखविले तरी आम्ही जाणार नाही. 2009 च्या शिवसैनिकामुळे आमदार म्हणून निवडून आलो.

चंद्रकांत मोकाटे म्हणाले, महाराष्ट्रात असा कोणता शेतकरी आहे, जो हेलिकॉप्टरने शेती करतो. सध्याचे सरकार महाराष्ट्रात आग लावण्याचे काम सुरू आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार द्यावा. शशिकांत सुतार आणि महादेव बाबर यांच्यासारखे उमेदवार आहेत. रघुनाथ कुचिक म्हणाले, कोरोना काळात पुणे महापालिकेत प्रचंड घोटाळा झाला. टॅंकर, फुटपाथ घोटाळा झाला. ज्या महापालिकेकडे आंबूलन्स नसल्याने एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्याच्यावर कोणी काहीही बोलत नाही. अधिकाऱ्यांनाही अटक झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.