Pune : समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यात डॉक्टरांइतकाच ‘फार्मासिस्ट’चा मोलाचा वाटा-अर्जुन देशपांडे

एमपीसी न्यूज – “फार्मासिस्ट हा समाजासाठी पर्यायी (Pune )डॉक्टर असतो. लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी फार्मास्युटिकल आणि फार्मासिस्ट समुदायाने प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यात फार्मासिस्ट मोलाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन जेनरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे यांनी केले. ‘सूर्यदत्त’च्या वतीने सुरु झालेल्या या फार्मसी महाविद्यालयातून फार्मा क्षेत्रासाठी उपयुक्त व कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चचे (एससीपीएचआर) (Pune )उद्घाटन व ‘एससीपीएचआर’ आयोजित ‘सूर्यदत्त ग्लोबल फार्माकॉन 2023’चे उद्घाटन अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी झाले. बावधन येथील सूर्यदत्त कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात हा संपन्नझाला. डॉ. चंद्रकांत कोकाटे होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, बाळ कुलकर्णी, प्रसन्न पाटील, सहायक पोलीस आयुक्त महेशकुमार सरतापे, अभिनेता शरद सांकला, प्रा. हेमंत जैन आदी उपस्थित होते.

Pune : शिवसेना अजिंक्य आहे; तुम्ही 2024 मध्ये शिल्लक राहणार नाही; संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा

यावेळी अर्जुन देशपांडे यांना फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सूर्यदत्त धन्वंतरी ग्लोबल आयकॉन अवॉर्ड-2023’ पुरस्कार देऊन, तर डॉ. चंद्रकांत कोकाटे, शरद सांकला, महेशकुमार सरतापे, बाळ कुलकर्णी, प्रसन्न पाटील यांना ‘सूर्यदत्त सूर्यभारत सूर्यगौरव ग्लोबल सन्मान-2023’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फार्मा क्षेत्रातील उद्योजक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्जुन देशपांडे म्हणाले, “कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि फार्मासिस्ट फ्रंटलाईनवर काम करत होते. ग्रामीण भागातही जिथे डॉक्टरांची कमतरता भासते, तिथे फार्मासिस्ट मदतीला येतो. फार्मा क्षेत्रात उद्योगांच्या मोठ्या संधी आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हायला हवीत, यासाठी जेनेरिक आधारची सुरुवात केली. आज देशभरातील करोडो लोकांना ही सेवा पुरवत असून, आठ हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार दिला आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.