Pune : शिवचरित्राच्या जागराने श्रोते भारावले

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील ( Pune) विविध पैलूंचे वक्त्यांनी घडवलेले मनोज्ञ दर्शन, श्री शिवरायांच्या पराक्रमाची थोरवी गाणारी भाषणे आणि हिंदवी स्वराज्याचे अनन्यसाधारण महत्त्व श्रोत्यांसमोर उलगडत गेले आणि शिवचरित्राच्या या जागराने श्रोतेही भारावले.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांच्या व्याख्यानाने झाला. शिवचरित्राच्या या जागराला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

Pimpri : अंगणवाडी सेविका मदतनिसांचा प्रश्न सोडवण्याचे भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे आश्वासन

महर्षी विनोद रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. संप्रसाद विनोद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी लेखन आणि व्याख्यानांच्या रूपाने जे कार्य केले, त्या कार्याची थोरवी देखील यावेळी मांडण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि इतिहासाला वेगळे वळण मिळाले. त्यांचे प्रेरणादायी चरित्र सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे वंजारवाडकर म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कवी होते, लेखक होते, दिग्दर्शक होते, इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांनी विविध माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवले. असे डॉ. विनोद यांनी सांगितले.

शिवचरित्र सर्वांना भावेल अशा पद्धतीने मांडणी करत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राचा प्रसार केला. त्यांचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे शिवचरित्र मराठी मनावर पकड निर्माण करते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कला, प्रतिभेसह अनेक गुणांनी संपन्न होते, असे तेंडुलकर म्हणाले.

संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त दिवाकर पांडे यांनी प्रास्ताविक आणि नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन  ( Pune)  केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.