Pune : पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला जात नारायणगाव बायपासजवळ (Pune) अपघात झाला.  समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा हा अपघात झाला.

Pimpri : सिग्नलच्या कामामुळे रविवारी लोकल व इतर एक्सप्रेसचा मेगा ब्लॉक, एकूण 12 गाड्या रद्द

या अपघातात 14 प्रवासी  किरकोळ जखमी झाले आहेत.  दरम्यान अपघातग्रस्त बसचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने समोरील काच फोडुन प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले असुन जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने अपघाताचा मोठा अनर्थ टळल्याची भावना  यावेळी प्रवाशांनी व्यक्त (Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.