Pune : 2 लाख 20 हजार 124 वेळा श्री राम लिहीत चिंचवडच्या श्रुती गावडे ने साकारली प्रभू श्रीरामाची अक्षर रांगोळी, स्वतःचाच रेकॉर्ड मोडत रचला विश्वविक्रम

एमपीसी न्यूज – प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत (Pune)असताना देशभर विविध उपक्रम सुरू असताना, बालेवाडी, पुणे येथील श्रुती हिने 2 हजार 400 स्क्वेअर फीट रांगोळी रेखाटली आहे.

त्यामध्ये प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना दिवसाची ऐतिहासिक तारीख 220124 (दोन लाख, वीस हजार एकशे चोवीस) वेळा, श्री राम या राम नामाचा जप करत ही रांगोळी एकटीने रेखाटली आहे.

Pune : युवक सरचिटणीस महेश हांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ही रांगोळी तयार होण्यासाठी 21 तासांचा वेळ लागला(Pune) व सुमारे 510 किलो रांगोळीचा वापर केला आहे. अशी अक्षर मुद्रण रांगोळी पहिल्यांदाच श्रुतीने साकारली आहे. ह्या रांगोळीची नोंद इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून विशेष म्हणजे यंदा, श्रुती ने स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच मोडला आहे. या रांगोळीचे राहूल उत्तम बालवडकर यांनी आयोजन केले होते, तसेच श्रुतीचे आई आणि भाऊ यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

 

श्रुतीच्या दिवंगत वडिलांची इच्छा होती, आपल्या मुलीने जगाच्या पाठीवर नाव कोरावं, आणि आज तो आनंदाचा क्षण आला आहे अशी भावना श्रृतीने व्यक्त केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.