Pune :बालगंधर्व येथे 130 विद्यार्थ्यांच्या शेकडो दर्जेदार चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

एमपीसी न्यूज – सामजिक जीवनाचे आपण एक घटक (Pune)आहोत आणि पर्यावरण वाचवणे ही आपली जबाबदारी आहे हे सांगणारे पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा, सेव्ह द टायगर, झाडे वाचवा असा सामाजिक संदेश देणारी चित्रे पाहण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैला प्रदीप सिन्नरकर Pune)यांच्या रेग्युलर ड्रॉईंग क्लासेस’ मधील विध्यार्थ्यांच्या शेकडो चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळ्याचे मयूर चंदने यांच्या हस्ते करण्यात आले.

Pune : सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल) आंतर क्लब 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत प्रबल पँथर्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश 

यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी विशेष उपस्थिति लावली होती. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वनाने करण्यात आली.
या प्रदर्शनामध्ये या वर्षी 130 विध्यार्थी सहभागी झाले प्रदर्शनात असून त्याबरोबर पोट्रेट, कॅनव्हॉस् पेटिंग, कॉफी पेटिंग, म्यूरल्स, निसर्गविंगे, पोन्सल शीडा, स्थिर चित्रे अशा वेगवेगळ्या विषयांवरील चित्रे प्रदर्शनात आहेत.

विलास कुलकर्णी म्हणाले की मोबाईल, इंटरनेट आणि संगणकाच्या काळात देखील चित्रकला तिचे अस्तित्व टिकवून आहे. तसेच येणारी नवीन पिढीला चित्रकलेची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी सिन्नरकर यांचे योगदान मोठे आहे. ते पुढे म्हणाले की चित्रकला माणसाला जगायला शिकवते. ही कला टिकवणे महत्वाचे आहे.

सिन्नरकर म्हणाल्या की, लहान मुले ही आपल्या देशाची भावी पिढी आहे. ती कलेच्या क्षेत्रात कुठेही मागे राहू नये व त्यांना कलेबदल आवड निर्माण व्हावी व क्लासला येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने बालगंधर्व कलादालन येथे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. 130 विद्यार्थ्यांचे शेकडो चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे 28 जाने पर्यंत सकाळी 10 ते 8 सुरू राहणार राहणार असून ते विनामूल्य उपलब्ध आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.