Pimpri : ‘जल्लोष शिक्षणाचा 2024’ अंतर्गत शिक्षकांसाठी संगणक विज्ञान आणि भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रमाचे अनावरण

एमपीसी न्यूज – शालेय विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता (Pimpri )वाढवण्यासाठी आणि नवकल्पना वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाय जॅम फाऊंडेशनच्या सहकार्याने शिक्षकांसाठी ‘संगणक विज्ञान आणि 21 व्या शतकातील भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रम पुस्तिका (हँडबुक)’ सादर केली.

23 आणि 24 जानेवारी रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (Pimpri )येथे “जल्लोष शिक्षणाचा 2024” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे महत्त्व ओळखणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्या उमा खापरे यांच्या उपस्थितीत झाला.

Pune :बालगंधर्व येथे 130 विद्यार्थ्यांच्या शेकडो दर्जेदार चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

शिक्षकांसाठी संगणक विज्ञान अभ्यासक्रमाचे अनावरण ही “जल्लोष शिक्षणाचा 2024” उपक्रमातील एक मैलाचा दगड आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने डिजिटल संसाधने आणि कौशल्ये जसे की समस्या सोडवणे, सर्जनशीलता आणि नवकल्पना यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पाय जॅम फाउंडेशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रांद्वारे 250 हून अधिक शिक्षकांना आवश्यक संगणक आणि डिजिटल कौशल्ये प्रदान करण्यात आली.

पाय जॅम फाउंडेशन, 2017 पासून सामाजिक कल्याणामध्ये सक्रियपणे कार्यरत असून, मुलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविण्यात, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान निर्माते बनण्यासाठी सक्षम बनविण्यात, सरकारी शाळांसाठी अभ्यासक्रम विकसित करण्यात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे पालन करून उच्च-कुशल शिक्षक बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अशी माहिती पाय जॅम फौंडेशनच्या प्रांजली पाठक, महेश तोत्रे आणि शुभम बडगुजर यांनी संयुक्तपणे दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.