Pune : ‘मला समजलेले बापू’ निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – “राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा ( Pune) मुख्याध्यापक संघ” यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित (इ. 8 वी ते 10 वी) माध्यमिक शाळां मधील विद्यार्थ्यांकरीता, “मला समजलेले बापू अर्थात् महात्मा गांधी” या विषयावरील, निबंध स्पर्धेचा अंतिम टप्पा असून शाळांकडून देखील चांगला व सकारात्मक प्रतिसाद (Pune ) मिळाला आहे. 
एकुण 1424 निबंधांपैकी, 1160 निबंध स्पर्धे साठी पात्र ठरले असुन, त्यातील प्रती इयत्ता प्रथम(1), द्वीतीय(1) व तृतीय (2) = 4 व 11 उत्तेजनार्थ अशी प्रती इयत्ता 15रोख पारितोषिके अशी सु 75000 ची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याचे स्पर्धेचे संयोजक व निमंत्रक गोपाळ तिवारी यांनी सांगितले.
 ‘मला समजलेले बापू’ अर्थात महात्मा गांधी ‘ याविषया वरील निबंध स्पर्धेचे आयोजन स्व. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने कारण्यात आले होते. या स्पर्धेला शहरातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 85 शाळांमधून बाराशे विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेतला असल्याची माहिती राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे, स्पर्धेचे परीक्षक आणि बाल साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, राजीव गांधी स्मारक समितीचे ॲड. स्वप्नील जगताप, भोलेनाथ वांजळे, गणेश शिंदे, धनंजय भिलारे, संजय अभंग, गणेश मोरे, राजेश सुतार, नरेश आवटे, शंकर शिर्के, उदय लेले, विजय शेरे, ॲड. फैयाज शेख आदी उपस्थित होते.
गोपाळ तिवारी म्हणाले,  सध्या दूषित होत चाललेल्या सामाजिक, राजकीय वातावरणात (Pune ) किशोरवयीन मुलांना गांधीजी आणि त्यांच्या विचारांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक – उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातून जवळपास 85 शाळांमधून 8वी, 9वी व 10वी च्या बाराशे विद्यार्थांनी आपले निबंध या स्पर्धेसाठी पाठवले आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण येत्या 23 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 5 वा. केसरीवाडा येथे होणार आहे.
विशेष म्हणजे स्पर्धेला वाढता प्रतिसाद पाहता स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आली असून आता 75 हजार रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र विजेत्यांना दिले जाणार आहेत, असेही तिवारी यांनी सांगितले.  रोख पारितोषिके व सन्मान चिन्हां व्यतिरिक्त ही ‘अभिनव शिक्षण संस्थे तर्फे विजेत्यांना राष्ट्रपुरषांची प्रेरणादायी पुस्तके’ भेट दिली जाणार असून, निबंध स्पर्धेतील ‘पात्र सहभागी विद्यार्थ्यांना’ प्रशस्तिपत्रके देणार असल्याचे संयोजन समितीने जाहीर केले.
हा बक्षीस समारंभ जेष्ठनेते व केरळचे माजी ऊपमुखमंत्री रमेशजी चेनीतला व मान्यवर नेत्यांच्या हस्ते व विधान सभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, डॅा विश्वजित कदम समवेत इंडीया आधाडी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होईल.

पुणे शहर माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजीत जगताप यांनी राजीव गांधी स्मारक समितीने घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन झालेल्या प्रबोधनपर प्रयत्नांमुळे, देशाचा ईतिहास, स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधींची तत्वे इ विषयी विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पडेल असे सांगितले. स्मारक समितीच्या कार्यांचे कौतुक केले.
पुणे शहरात ‘निबंध स्पर्धेची’ माहीती देणारे 150 बॅनर्स लावण्यात आले होते. शाळा प्रशासनाकडुन देखील ‘स्मारक समिती सदस्यांना’ सन्मानाची वागणुक व सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे गोपाळ तिवारी म्हणाले.  राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, स्वातंत्र्या करीता शहीद झालेल्यांचे योगदान व ‘स्वतंत्र – भारताची’ ऊभारणी इ बाबत विद्यार्थ्यांना, निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन अंतर्मुख करण्याचा अल्प प्रयत्न करण्यात आला आहे.
बापूंना राष्ट्रपिता किताब कुणी व का दिला..? याची देखील माहीती विद्यार्थ्यांच्या ठायी असल्याचे दिसुन आले. महात्मा गांधींच्या विशाल नेतृत्व व व्यक्तिमत्वाचे, बापूंच्या सत्य, अहिंसा, मानवता आदी असाधारण गुणांचे, स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक पैलु व प्रसंगांचे, मानवी जीवना विषयीच्या दृष्टीकोनाची मीमांसा करण्याचा प्रयत्न आहे.भारत लोकशाही प्रधान देश आहे.
हजारों हौतात्म्यांच्या बलीदानानंतर देशास स्वातंत्र्य मिळाले. बापूंच्या अहिंसावादी चळवळीत मोठ्या धर्मनिरपेक्ष शक्तींचा सहभाग होता. प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी होते. साधनांची वानवा व प्रतिकूल परिस्थितीत देखील, बापूं’नी कठोर निग्रह, ईश्वर निष्ठा व आत्मबळाच्या जिद्गीवर अहिंसात्मक व मुत्सदेगीरीच्या जोरावर स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. मातृभुमि विषयी प्रेम, श्रध्दा, निष्ठा व स्वावलंबनाची भावना त्यांनी लोकांमध्ये जागृत केली..! स्वार्थाचा त्याग करत “बापूंची 7 सामाजिक पापें व 11 व्रते” निर्धारीत केली.
(सिध्दांत बिना राजनिती, काम बिना धन) “तत्वहिन – राजकारण व विनाकष्ट-संपत्ती” ही महात्मा गांधींची 7 सामाजिक पापांपैकी 2 प्रमुख पापे असल्याचे राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अघ्यक्ष गोपाळ तिवारी यांनी सांगितले.  या प्रसंगी पुणे शहर माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजीत जगताप, कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे, सुभआषशेठ थोरवे, शाळांमध्ये निबंध स्पर्धेची माहीती पत्रक पोहोचवणे, निबंध गोळा करणे इ कार्य स्मारक समितीचे सदस्य भोला वांजळे, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, ॲड फैयाझ शेख, धनंजय भिलारे, संजय अभंग, गणेश मोरे, राजेश सुतार, नरेश आवटे इ उपस्थित  (Pune ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.