Pune : नागरिकांमध्ये कचरा निर्मूलन विषयक जनजागृती करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

आयुक्त सौरभ राव यांचे अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 संदर्भात आढावा बैठक

एमपीसी न्यूज- नागरिकांमध्ये कचरा निर्मूलन व जनजागृतीबाबत माहिती देऊन स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानात सहभागी होण्या करिता आवश्यक मार्गदर्शन करा. तसेच शहरातील विविध संस्था, मंडळे यांनाही सहभागी करुन घेऊन कार्यक्रम, कार्यशाळांचे आयोजन करा असे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका मुख्य भवनात आयुक्त सौरभ राव यांचे अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्वेक्षण 2020 संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सुरेश जगताप, विजय दहिभाते, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, उपायुक्त नितीन उदास तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त व स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेचे संचालक हर्षद बर्डे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत क्षेत्रिय कार्यालय निहाय स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत विविध कामकाजांचा आढावा आयुक्तांनी घेतला.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत करावयात येणाऱ्या उपाय योजना व नियोजन व प्रभाग निहाय अंमलबजावणी करताना येणाऱ्या विविध अडचणी या संदर्भात महापालिका आयुक्तांनी क्षेत्रिय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व स्वच्छ संस्थेचे पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील काही भागातून अधिक प्रमाणात जमा होतो. अशा बाजारपेठा, विविध कार्यालये, भाजी मार्केट, मंडई, मोठ्या स्वरुपाच्या मंदिरे, प्रार्थनास्थळे, हॉटेल्स, मंगल कार्यालये, व्यापारी संकुले, मोठ्या आस्थापना, वसाहती, झोपडपट्टी परिसर अशा ठिकाणी कचरा निर्मूलनाकरिता संबंधित क्षेत्रिय कार्यालयांनी कशा प्रकारे नियोजन केले आहे याची माहिती देण्यात आली.

याकरिता मनुष्यबळ नियोजनासह छोट्या-मोठ्या घंटागाड्या, डीपी, बीआरसी, छोटा हत्ती, जेटिन्ग, कॉम्पॅक्टर अशा वाहनांचे नियोजन, कचरा गोळा करणे, कचरा गाडीत भरणे, कचरा वाहतूक, कचरा विलगीकरण, दैनंदिन कचरा गोळा करणे, कचरा निर्मूलनाकरिता, कचरा विलगीकरणाकरिता, परिसर स्वचछतेबाबत, आकडेवारीसह आढावा घेण्यात आला.

कचरा अधिक होणाऱ्या जागा व कंटेनर संख्या कमी करणे, परिसरातील अन्य घटकांप्रमाणेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील नागरिकांचा कचरा निर्मूलनाबाबत नियोजन करणे, परिसर सौंदर्यीकरणाअंतर्गत विविध उपक्रम राबविणे, परिसर स्वच्छतेबाबत अधिक प्रमाणात होणाऱ्या कचऱ्याच्या जागा याबाबत काम करण्यापुर्वीचे व नंतरचे छायाचित्रे घेणे, जलद संवादाकरिता बल्क एस एम एस सुविधा उपलब्ध करुन देणे व संवाद प्रक्रिया चालू करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत मोबाईल अॅप विकसित करुन प्रभावी व जलद संवाद साधणेकरिता प्रक्रिया पूर्ण करणे अशा विविध कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेण्यात येऊन यामधील सर्व यंत्रणांचे एकत्रित नियोजन करुन विविध उपक्रम राबविण्याबाबत महापालिका आयुक्तनी चर्चा केली व प्रभावी नियोजन करणेबाबत विविध सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.