Pune : स्वामी विवेकानंद विचार मंचतर्फे सोमवारपासून ‘राष्ट्रीय विचारांचा वाग्यज्ञ’ व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंद विचार मंचाच्या वतीने राष्ट्रीय विचारांचा वाग्यज्ञ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि.23) ते शुक्रवार (दि.27) दरम्यान संगम हॉल, स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ, पद्मावती येथे दररोज संध्याकाळी7 वाजता ही व्याख्यानमाला रंगणार आहे.

या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सोमवारी (दि.23) कॅ स्मिता गायकवाड या ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर गुंफणार आहेत.

मंगळवारी (दि.24) ‘मोरोपंत पिंगळे आणि दत्तोपंत ठेंगडी व्यक्ती व कार्य’ या विषयावर प्रा. शरद कुंटे आपले विचार मांडणार आहेत.

बुधवारी (दि.25) व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प ‘काश्मीर कलम 370 व 35 अ’ या विषयावर शैलेंद्र देवळांणकर गुंफणार आहेत.

गुरुवारी (दि.26) ‘साहित्यिक सावरकर’ या विषयावर अभिनेते योगेश सोमण आपले विचार व्यक्त करतील.

शुक्रवारी (दि.27) व्याख्यानमालेचा समारोप ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांच्या मुलाखतीने होणार आहे. दीपा देशमुख या त्यांच्याशी संवाद साधतील.

ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून जास्तीतजास्त नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंचाचे अध्यक्ष रा. वा. अत्रे, उपाध्यक्ष संजय घाटपांडे, विश्वस्त डॉ वा. मा. मिरासदार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.