Pune : ताडीवाला रस्ता परिसरातील वर्दळीवर नियंत्रण आवश्यक : सौरभ राव

परिसरात पाहणी करून केल्या विविध सूचना

एमपीसी न्यूज – कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत ताडीवाला परिसरात काही रस्त्यांवरील प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्दळीवर देखील नियंत्रण गरजेचे असून, रेशनिंगसह या भागातील भाजीविक्रीच्या वेळेबाबत नियोजन गरजेचे असल्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

ताडीवाला रस्ता परिसराची सौरभ राव यांनी आज ( बुधवारी) पहाणी केली. यावेळी ताडीवाला रस्ता येथील गल्ली क्रमांक १ ते ४८ ची पहाणी करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत येथील सध्यस्थितीबाबत व पुढील कालावधीत करावयाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेविका लता राजगुरू, प्रभाग समिती अध्यक्ष मंगला मंत्री, स्थानिक कार्यकर्ते, क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत करावयाच्या कामकाजसंदर्भात आढावा बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे, हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीच्या अध्यक्षा पूजा कोद्रे, वैशाली बनकर, नंदाताई लोणकर, हेमलता मगर, आबा तुपे, हडपसर मेडिकल संघटनेचे डॉ. मंगेश वाघ, संघटनेचे अन्य डॉक्टर्स, हडपसर मुंढवा क्षेत्रीय अधिकारी सुनील यादव व अन्य अधिकारी उपस्थतीत होते.

या बैठकीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी बाबत सविस्तर चर्चा करणेत आली. माळवाडी हडपसर परिसरातील झोपडपट्टी भागाची संपूर्ण पहाणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.