Pune Workshop: पुण्यात भरली आगळीवेगळी नाट्यवाचन कार्यशाळा

एमपीसी न्यूज : मातृभाषा अध्यापक संघ आणि माझं पुणं सुंदर पुणं‘.यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यवाचन कार्यशाळा 30 जुलै रोजी भरविण्यात आली होती.(Pune Workshop) यावेळी प्रमख पाहुणे म्हणून पटकथा लेखक मिलिंद गाडगीळ उपस्थित होते.

तसेच मातृभाषा अध्यापक संघाच्या अध्यक्षा स्मिता ओव्हाळ, माझं पुणं सुंदर पुणं,’संस्थेचे अध्यक्ष योगेश गोगावले, मार्गदर्शक हनुमंत कुबडे, सचिव संध्या माने, हेमलता भूमकर, शारदा पानगे,शामला पंडित, निलम गीताभारती, सुरेखा लेंबे,सुरेखा सोनवणे, मंगल निफाडकर हे मातृभाषा अध्यापक संघांच्या सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.मिलिंद गाडगीळ यांनी मार्गदर्शन करताना ‘नाट्यवाचनासाठी कार्यशाळा’ या विषयावर माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच प्रयोग आहे. त्याबद्दल संघाचे व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक घटकाचे अभिनंदन केले.

Pimpri-Chinchwad rally: शाहूनगर मध्ये फाळणी स्मृतिदिनानिमित्त मूक मिरवणूक

तसेच नाटक ही 64 कलांमधील श्रेष्ठ कला आहे.बाराखडी मोठ्याने म्हणावी. विरामचिन्हांचा योग्य अर्थ लक्षात घेऊन वाचन करावे.वाचनाच्या आधी एक तास मुलांनी जेवलेले असावे. सैलसर कपडे असावेत.(Pune News) हात न हालवता वाचन करावे. नाट्यवाचनापूर्वी स्थल,काल व प्रसंग याविषयी माहिती द्यावी.मा.घोटकर सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एखादा विद्यार्थी ऐन वेळी अनुपस्थित राहिला तर ज्याला कोणतंही पात्र वाचता येईल असा विद्यार्थी तयार ठेवावा. यासाठी श्रीराम लागू यांचे ‘वाचिक अभिनय’हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून वापरावे याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.

नाटक व्यावहारिक जगाशी जोडलेलं असावं. वाचनाने माणूस घडतो.नाट्यवाचन बसवताना शिक्षकांची ही प्रगल्भता वाढते. नाट्यवाचनात सहभागी होताना आनंद घेत सहभागी व्हावे. (Pune workshop) मा.पढेर सर यांनी प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे महत्त्व विशद केले. मार्गदर्शक हनुमंत कुबडे यांनी पाठावर आधारित नाट्यवाचन करता येईल असे मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.