Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune) माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मुंबई गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची कुजबुज सुरू आहे.

भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार संजय नाना काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, सर्वात आघाडीवर मोहोळ यांचे नाव आहे. कोरोना काळात मोहोळ यांनी महापौर असताना चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तातडीने उमेदवार जाहीर करण्याची मागणी कार्यकर्त्यांतर्फे करण्यात येत आहे. 2014 पासून पुण्यावर भाजपचा झेंडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. 2024 मध्येही मोदी लाट कायम राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Tathawade : ताथवडे येथे विविध क्षेत्रातील महिलांचा ‘सूर्य मंगल नारी गौरव पुरस्कारा’ने गौरव

कसबा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात पराभव करता येऊ शकतो, असा संदेश गेला आहे. तर, भाजपनेही हा (Pune) पराभव जिव्हारी लागल्याचे मान्य केले आहे. या पराभवाची भरपाई म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच्या झेंडा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.