Ravet : रावेत येथे विविध क्षेत्रातील महिलांचा ‘सूर्य मंगल नारी गौरव पुरस्कारा’ने गौरव

एमपीसी न्यूज – सूर्य मंगल बँक्वेटच्या वतीने विविध क्षेत्रात (Ravet) उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा ‘सूर्य मंगल नारी गौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनी (गुरुवार, दि. 8) ताथवडे येथील सूर्य मंगल डायनिंग अँड बँक्वेट येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

यामध्ये उत्कर्षा कुलकर्णी (मसाला उद्योजिका), ॲड सोनाली सावंत इधाते (विधी क्षेत्र), सृष्टी मोरे (क्रीडा क्षेत्र), प्रभा विलास (सामाजिक), डॉ. रिता सेटीया (वैद्यकीय क्षेत्र) यांचा सन्मान करण्यात आला.

आयोजक पंकज गादिया म्हणाले, चूल आणि मूल अशी महिलांच्या कर्तुत्वाची व्याख्या केली जायची. पण ही व्याख्या आज बदलली आहे. हॉटेल व्यवसायात स्वयंपाक घराला फार महत्त्व आहे. हॉटेल व्यवसायात काम करत असताना महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची संकल्पना पुरस्कार रूपाने साकारत आहे. या पुरस्कारासाठी महिलांची निवड करताना मोठे आव्हान होते. अनेक कर्तृत्ववान महिलांची नावे समोर होती. त्यातून यावर्षी पाच महिलांना सन्मानित करत आहोत. हा पुरस्कार सोहळा महिलांच्या कर्तुत्वाबद्दल एक कृतज्ञता असेल.

उत्कर्षा कुलकर्णी म्हणाल्या, “सन 2014 साली मसाला व्यवसायाला सुरुवात केली. घरची जबाबदारी सांभाळून उद्योग सुरू केला. अनेक दिवस भटकंती केल्यानंतर हळूहळू जम बसू लागला. शुद्ध आणि दर्जेदार मसाले विक्री आज भारतासह विविध देशांमध्ये जाऊन पोहोचली आहे. सुमारे 45 प्रकारचे मसाले विक्री सध्या सुरू आहे. महिलांनी त्यांची ताकद ओळखून व्यवसायात उतरणे आवश्यक आहे. आपण सक्षम होऊन इतर महिलांना देखील स्वतःच्या पायावर उभे करायला हवे. आज मी 25 महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे, याचा मला अभिमान वाटतो.

Chakan : आदिवासी बांधवांच्या जमिनीचा गैरवापर; अखेर मेदनकरवाडी हद्दीत वनविभागानेच केली अतिक्रमणांवर कारवाई

ॲड. सोनाली सावंत इधाते म्हणाल्या, “कायद्याचे शिक्षण घेताना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. शिक्षण झाल्यानंतर सुरुवातीला नोकरी केली. पण आपण ज्या विषयात पारंगत आहोत त्याबाबत इतरांना देखील मदत झाली पाहिजे यातून नवीन (Ravet) व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसायात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन केल्याने अनेक व्यावसायिक आमच्या सेवेने समाधानी आहेत ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. सूर्य मंगलने आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल आयोजकांचे आभार.

सृष्टी मोर म्हणाल्या, “कराटे शिकण्यासाठी आईने प्रोत्साहन दिले. त्यासह हँडबॉल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर एशियन चॅम्पियनशीप मध्ये भाग घेता आला. त्यानंतर विश्व स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात केली. पिंपरी चिंचवड शहरात आम्ही आतापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त मुलांनी कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यातून अनेक मुले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गेली आहेत. महाविद्यालयात असताना एनसीसी मध्ये भाग घेतला. तिथेही चांगली कामगिरी करता आली. 26 जानेवारी 2024 रोजी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडा घेता आला, याचा अभिमान वाटतो.

Chakan : आदिवासी बांधवांच्या जमिनीचा गैरवापर; अखेर मेदनकरवाडी हद्दीत वनविभागानेच केली अतिक्रमणांवर कारवाई

प्रभा विलास म्हणाल्या, “मुलींच्या स्वप्नांना आपण सर्वांनी बळ द्यायला पाहिजे. ज्या समाजाला शिक्षण म्हणजे काय; हेच माहिती नाही त्या समाजातून येत असतानाच एक मुलगी म्हणून मोठे आव्हान माझ्यावर होते. पण एमएसडब्ल्यू हे शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातूनच वर्क फॉर इक्वेलीटी या संस्थेची सुरुवात झाली. मुलींना अनेक अडचणींशी आज संघर्ष करावा लागत आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक भागातून सुमारे दोन हजार किशोरवयीन मुलींना एकत्र करून स्त्री पुरुष समानतेचे काम करण्यास उद्युक्त केले. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

डॉ. रिता सेटीया म्हणाल्या, “अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा सांगितल्या जातात. पण याशिवाय आता शिक्षण आणि आरोग्य देखील मूलभूत गरजा बनल्या आहेत. लहानपणापासून शिक्षणासाठी आलेल्या अडचणी इतर विद्यार्थ्यांना येऊ नये यासाठी मी काम करत आहे. आरोग्याच्या क्षेत्रात देखील काम करण्याची संधी मिळत आहे. अनेकांना शिक्षण आणि आरोग्यासाठी धडपड करावी लागत आहे. करोना सारखा कठीण प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला, त्यातही आम्ही मदतीचा ओघ सुरू ठेवला. हे केवळ सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले. इतरांना मदत करण्याची इच्छा प्रत्येकाने बाळगायला हवी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.