Pune : रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरणारे गजाआड

एमपीसी न्यूज – रात्रीच्यावेळी पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या (Pune) चोरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी पुण्यातील गंजपेठ येथे सोमवारी (दि.8) रात्री उशीरा केली.

निखील गोपाळ साळुंखे (वय 20 रा.लोहियानगर,पुणे), अथर्व अमर अवघडे (वय 19 रा.गंजपेठ) व प्रतिम प्रदिप कांबळे (वय 22 रा.गंजपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

IPL 2023-मुंबई इंडियन्सने सहा गडी राखून आरसीबीवर मिळविला विजय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनीट एकचे पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश साबळे यांना त्यांच्या बातमीदारार्फत माहिती मिळाली की, वरील तीन आरोपींची टोळी हि रात्री पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरत असून ते सध्या चोरीचे मोबाईल विकण्यासाठी गंजपेठ महात्मा फुले वाडा जवळ येणार आहेत.

पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे तीन चोरीचे मोबाईल पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, तीन फोन असा 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस तपासात आरोपीवरील खडक व फरासखाना पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे देखील उघड केले आहेत.तर प्रीतम कांबळे याच्यावर मारामारी, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला 2 वर्षा करीता तडीपार (Pune) केले होते. आरोपींवर याप्रकऱणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.