Lonavala news: पुणे ते मुंबई सद्भावना सायकल रॅली

एमपीसी न्यूज : सह्याद्री सायकल सायक्लोट्रेक व लोणावळा सायकलिंग क्लबच्या वतीने पुणे ते मुंबई सद्भावना सायकल रॅली २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई वर दहशतवादी झाला, खरे तर हा हल्ला मुंबई वर नसून हा हल्ला देशावर, मानवतेवर, सहिष्णूतेवर झाला होता. या हल्ल्या मध्ये अनेक निष्पाप नागरिक, लष्करी तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत, त्या सर्व पवित्र आत्म्यांना श्रद्धांजली देणाच्या हेतूने सद्भावना सायकल रॅली चे आयोजन २००९ साला पासून करण्यात येते आहे.

Chinchwad News : रमेश पतंगे संघ विचारांचे आधुनिक भाष्यकार- प्रा. डॉ. सदानंद मोरे

२००९ मध्ये ४ जण या रॅली मध्ये सहभागी झाले आणि आज २६ नोव्हेंबर २०२३ मधील रॅली मध्ये १००+ सायकल स्वरांनी सहभाग घेतला. २६ नोव्हेंबर बरोबरच ‘सायकल चालवा, निरोगी राहा’, ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, निसर्ग वाचवा’. हे संदेश या रॅली मार्फत देण्यात येत आहेत.
या वर्षीच्या रॅली मध्ये ८ वर्षे ते ६० वर्षाच्या 100 हून अधिकारी सभासदांनी सहभाग घेतला.

ध्रुव सॉफ्टवेअर, न्यूक्लियस न्यूट्रिशन, एस के पी कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड, फॉक्स हिल टुरिझम, रिव्हज, गोल्ड जिम, औंध-बाणेर, पुणे पोलिस तसेच पिंपरी चिंचवड पोलिस यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.