Maval News : तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय प्रथम

 एमपीसी न्युज – इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील 19 वर्षे मुलींच्या (Maval News) गटाने मावळ तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. नुतन विद्यालय, पुणे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेकरिता संघाची निवड झाली आहे. 

जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा कार्यालय पुणे तसेच सिद्धांत ज्युनिअर कॉलेज सुदुंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण संचालिका प्रा प्रतिभा गाडेकर यांचे खो-खो संघास मार्गदर्शन लाभले.

Chinchwad News : रमेश पतंगे संघ विचारांचे आधुनिक भाष्यकार- प्रा. डॉ. सदानंद मोरे

खेळाडूंच्या खो – खो स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य (Maval News) डॉ. एस के मलघे,उपप्राचार्य प्रा अशोक जाधव आदींनी यशाबद्दल अभिनंदन करुन विशेष कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.