Pune : ट्रोलिंगची सवय झाली आहे, मी भजन केलं तरी ट्रोल होते – अमृता फडणवीस

एमपीसी न्यूज : मी भजन केलं तरी ट्रोल होते. आता मला (Pune) ट्रोल होण्याची सवय झाली आहे. त्यामुळे मला ट्रोल केल्याने काहीही फरक पडत नाही. परंतु, असं असलं तरीही लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी माझं काम करत राहणार आहे असं अमृता फडणवीस म्हणाल्या. सोमवारी अमृता फडणवीस पुणे दौऱ्यावर होत्या. पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी अनेक विषयांवर आपली रोखठोक मत व्यक्त केली. 
अमृता फडणवीस म्हणाल्या, माझे नवीन गाणे अनेक लोकांना आवडले आहे. अनेक लोकांनी ते स्वीकारले आहे. माझ्या गाण्यावर रिच तयार होतात याचा मला आनंद आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांना देखील माझे गाणे आवडले आहे त्यामुळे माझ्या विषयी कोणीही काहीही बोलले तरी मी काम करतच राहील असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादावर देखील आपली प्रतिक्रिया दिली. अमृता फडणवीस म्हणाल्या प्रत्येक विषयावर लोकांची विचार असतात. त्यामुळे तुम्ही जे आहात ते आहात दबून जाऊ नका पण, कुठे कसं वागायचं याचे देखील भान राखले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचे व्यावसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळे असते. सध्या महिलाच महिलांना मागे ओढतात. एकमेकांविषयी चुकीचे बोलत आहेत हे थांबवलं पाहिजे असंही अमृता फडणवीस म्हणाल्य.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.