Pune Crime News : पुण्यात कोयता गॅंग सक्रिय; हातात कोयते घेऊन धुमाकूळ

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगची (Pune Crime News) दहशत दिसून येते. शहराच्या वेगवेगळ्या भागात हातात कोयता घेतलेल्या व्यक्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कोयता गॅंगने पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत या कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. तापकीर गल्ली येथे असणाऱ्या मोबाईल मार्केटमध्ये हातात कोयते घेऊन काही टवाळखोरांनी दहशत माजवली.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तापकीर गल्लीत मोबाईल मार्केट आहे. काही टवाळखोरांनी या मोबाईल गल्लीत हातात कोयते घेऊन प्रवेश केला आणि स्थानिक दुकानदारांची नासधूस केले. समोर दिसेल त्याची तोडफोड करत हे टोळके पुढे जात होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा मोबाईल मार्केटमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच हे सर्व टवाळखोर पसार झाले. घटनास्थळी पडलेला एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान हे टवाळखोर होते कोण, कुठून आले होते आणि त्यांनी धुडगूस का घातला याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Pune : ट्रोलिंगची सवय झाली आहे, मी भजन केलं तरी ट्रोल होते – अमृता फडणवीस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.