Pune : पाय घसरला आणि घोडनदीत बुडाला, वाढदिवशीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील (Pune) आंबेगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रांजणखळगे पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा घोड नदीत बुडून मृत्यू झाला. साईप्रसाद बालमालकोंडाया वेण्णापुसा (वय 18) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची नाव आहे. वाढदिवशीच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नारायणगाव येथील गुरुवर्य रापस सबनीस महाविद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये साईप्रसाद शिक्षण घेत होता. साईप्रसाद हा मूळचा आंध्र प्रदेशातील होता. शिक्षणासाठी तो या ठिकाणी आला होता. दरम्यान रविवारी त्याचा वाढदिवस असल्याने तो मित्रांसोबत चास येथे पर्यटनासाठी गेला होता.

दरम्यान रांजण खळगे पाहत असताना पाय घसरल्याने साईप्रसाद घोडनदीत कोसळला. त्यानंतर तो बराच काळ सापडला नाही. त्याच्या वडिलांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फोन करून मुलगा पाण्यात पडल्याची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात साईप्रसादचा शोध घेण्याचा प्रयत्न (Pune) सुरू होता. परंतु, तो सापडला नाही. घोडेगाव पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime News : पुण्यात कोयता गॅंग सक्रिय; हातात कोयते घेऊन धुमाकूळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.