Pimpri News: वाकडमध्ये अत्याधुनिक बॅटमिंटन कोर्ट उभारणार; ‘डीबीटी’चा लाभ आगामी शैक्षणिक वर्षापासून

एमपीसी न्यूज – चर्‍होलीमार्गे विमानतळाला (Pimpri News) जाणारा 90 मीटर रस्ता विकसित केला जाणार आहे. पशुसवंर्धन विभागाची ताथवडेतील जागा जलनिस्सारण कामासाठी घेण्यात येणार आहे. वाकडमध्ये अत्याधुनिक 8 कोर्टचे बॅडमिंटन कोर्ट आणि शुटिंग रेज उभारण्याचा मानस आहे. अण्णासाहेब मगर क्रीडासंकुलाचा कायापालट करणार, आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’चा लाभ देणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आयुक्त सिंह म्हणाले, भक्ती – शक्ती निगडी ते मुकाई चौक किवळे बीआरटीएस रस्ता, बोपखेल आणि खडकी बाजार यांना जोडणारा मुळा नदीवरील पूल, पिंपरीगाव ते पुणे – मुंबई महामार्ग यांना जोडणारा लोहमार्गावरील पूल, निगडी ते भोसरी स्पाईन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील राहिलेले काम आणि काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी रस्त्यावरील आयुक्त बंगल्यासमोरील रस्ता हे महत्त्वाचे रस्ते प्रकल्प मार्गी लावेल जाणार आहेत.

मोशी बायोमायनिंग प्रकल्प, हॉटेल वेस्टपासून (Pimpri News) गॅस निर्मिती, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, शिक्षणाचा जल्लोष गुणवत्ता वाढीवर भर आणि  चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प आदी बहुउद्देशीय प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहेत. क्रीडा विभागासाठी वाकडमध्ये 8 कोर्टचे बॅडमिंटन कोर्ड आणि शुटिंग रेज उभारण्याचा मानस आहे. यासह पायाभूत सुविधा, नवीन डिपी रोड विकसित करणे, मोशीत बायोमायनिंगचा दुसरा प्रकल्प उभारण्यात येणार असूव यासाठी निधीची तरतूद करणे, उद्यान विभागासह 7 ते 8 विभागावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच अंदाजपत्रकात जुन्या प्रकल्पांसाठीही निधी देण्यात येणार आहे.

Pune : पाय घसरला आणि घोडनदीत बुडाला, वाढदिवशीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.