Pune Crime : आरोग्य सल्लागार महिलेवर पाळत ठेवणारे दोन गुप्तहेर अटकेत

एमपीसी न्यूज : परदेशात शिक्षण झालेल्या (Pune Crime) आणि सध्या आरोग्य सल्लागार असलेल्या एका महिलेवर गुप्तपणे पाळत ठेवून तिची माहिती काढणाऱ्या दोघा गुप्तहेरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातून ही कारवाई करण्यात आली.

निलेश लक्ष्मण सिंग परदेशी आणि राहुल गुणवंतराव बिरादार अशी अटक करण्यात आलेल्या या दोघा गुप्तहेरांची नावे आहेत. कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन व्यक्ती आपला पाठलाग करत आहेत. आपली छायाचित्रे काढत आहेत असा संशय फिर्यादी महिला आला होता. या महिलेने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या भरोसा सेल या ठिकाणी तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने या महिलेने गुन्हे शाखेत याविषयी तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीची दखल घेतली असता दोन व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याची दिसून आले.

7 जानेवारी रोजी ही महिला कोरेगाव पार्क (Pune Crime) परिसरातील एका हॉटेलमध्ये गेली असता दोन व्यक्ती लपून त्यांचे फोटो काढत असताना आढळून आले. यावेळी साध्या वेषात असलेल्या पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. सध्या या दोघांकडे कसून चौकशी सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pimpri News: वाकडमध्ये अत्याधुनिक बॅटमिंटन कोर्ट उभारणार; ‘डीबीटी’चा लाभ आगामी शैक्षणिक वर्षापासून

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.