Pune : ससूनमध्ये आणखी दोन बळी; आतापर्यंत एकूण 48 मृत्यू, 24 पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यूही होऊ लागला आहे. आज ( गुरुवारी) आणखी दोन रुग्णांनाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या ससूनमधील कोरोना मृतांची संख्या 48  झाली आहे. दरम्यान, 24  रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बी. जे. शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी ही माहिती दिली.  देशभरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना टेस्टची संख्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सरकाकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे शहरात कोरोना कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुणे शहरात एकट्या ससून रुग्णालयात कोरोना मृतांची संख्या 48  झाली. आज ( गुरुवारी) आणखी दोन रुग्णांनाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तर, 24  रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ससून रुग्णालयात आज 156  रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 24  रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान   झाले. सध्या  ससूनमध्ये 129  कोरोना बाधित  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  75  संशयित रुग्णाही येथे दाखल आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या 9 रुग्णांना  व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर   14  रुग्णांवर  व्हेंटिलेटरशिवाय उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.