Pune: पिंपरी-चिंचवड येथील दोन कैद्यांचे येरवडा कारागृहातून पलायन

Pune: Two pimpri-chinchwad's Prisoner with serious offenses ran away from Yerawada Jail पोलिसांकडून या फरार कैद्यांचा शोध घेतला जात आहे.

एमपीसी न्यूज- येरवडा भागात सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून गंभीर गुन्हे दाखल असलेले दोन कैदी पळून गेले. ही घटना आज (दि.13) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून या फरार कैद्यांचा शोध घेतला जात आहे.

हर्षद सय्यद (20, रा. कासारवाडी) आणि आकाश बाबूराव पवार (26) हे दोन्ही कैदी पहाटेच्या वेळी तात्पुरत्या कारागृहातून पळून गेले. हर्षद सय्यद हा दरोड्याप्रकरणी तर आकाश पवार हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कैदेत होता.

कैदी पळून गेल्याचे लक्षात येताच कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.