_MPC_DIR_MPU_III

Pune University: ‘एमपीएससी’ परीक्षा आयोजनासाठी पुणे विद्यापीठाची तयारी सुरू

Pune University begins preparations for 'MPSC' examination परीक्षा केंद्रावरील प्रत्येक परिक्षार्थी व इतर कर्मचार्‍यांना सॅनिटायझर्स, मास्क आणि ग्लोव्हज उपलब्ध करून दिले जातील.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या सप्टेंबरमध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षेच्या आयोजनासाठी पुणे विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

आयोगाने परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर्स आणि थर्मामीटर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया जारी केली आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत असे सांगितले आहे की, संसर्ग रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाय केले जातील. प्रत्येक परीक्षा केंद्राची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण केले जाईल. परीक्षा केंद्रावरील प्रत्येक परिक्षार्थी व इतर कर्मचार्‍यांना सॅनिटायझर्स, मास्क आणि ग्लोव्हज उपलब्ध करून दिले जातील.

परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनरद्वारे तापमान मोजले जाईल. कोरोना संबंधित लक्षणे दाखविणाऱ्या उमेदवारांसाठी वेगळ्या आयसोलेशन विभागांची व्यवस्था करण्याचा निर्णयही आयोगाने घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

परीक्षेच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी मेटल डिटेक्टरद्वारे प्रत्येक उमेदवाराची कसून छाननी केली जाणार आहे. या सर्व बाबी संबंधित सेवा प्रदाता निवडण्यासाठी आयोगाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये ज्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, त्यांचे सुधारित वेळापत्रक 17 जून रोजी जाहीर केले होते. त्यानुसार या परीक्षा खालीलप्रमाणे पार पडणार आहेत.

1) राज्य सेवा पूर्व परीक्षा – 13 सप्टेंबर
2) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा – 11 ऑक्टोबर
३) महाराष्ट्र अभियांत्रिका सेवा पूर्व परीक्षा – 1 नोव्हेंबर

उमेदवारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दक्षता घेऊन परीक्षा घेण्यात येईल. राष्ट्रीय पातळीवर परीक्षा घेण्यासाठी प्रथमच असा प्रयत्न केला जात आहे, असे एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.