Pune : टिंबर मार्केट येथील विजय वल्लभ शाळेशेजारील घरांना लागलेल्या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण

मोठ्या प्रमाणात झाले आर्थिक नुकसान; 12 फायरगाङ्या झाल्या होत्या दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील टिंबर मार्केट, विजय वल्लभ शाळेशेजारी असणाऱ्या घरांना लागलेली आग अवघ्या अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमनने अटोक्यात आणली.  यात अनेक साहित्य जाळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून 12 फायरगाङ्या दाखल झाल्या होत्या. त्यामुळे अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळवता आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, संध्याकाळी 7:50 ला अग्निशमन दलाला आग लागली असल्याचा कॉल आला होता. त्यानुसार अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एकूण 12 फायर गाड्या, 3 टँकर आणि 5 देवदूत घटनास्थळी दाखल झाले होते.  अथक प्रयत्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, हि आग नेमकी कशामुळे लागली?, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सोडण्यात आलेल्या फायरगाड्या, 3 टँकर आणि 5 देवदूत’ चा तपशील : मध्यवर्ती अग्निशमन केंद्र = 4 फायर गाडी, टँकर 3 आणि देवदूत 1, कसबा केंद्रातून एक , नायडू केंद्रातून एक, देवदूत एक, कात्रज केंद्रातून एक, देवदूत एक, औंध केंद्रातून एक, एरंडवणा केंद्रातून एक, देवदूत एक कोंढवा खू. केंद्रातून एक, देवदूत एक, येरवडा केंद्रातून एक, कॅन्टोन्मेंट केंद्रातून एक अशा एकूण = 12 फायर गाड्या, 3 टँकर, 5 देवदूत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.