Pune : संभाजी भिडे यांच्या विरोधात विश्वजीत कदम यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी यांच्याबद्दल (Pune) संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. त्याच दरम्यान आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे आमदार माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर,पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

PCMC : …त्यामुळे  महापालिकेची स्वतंत्र ओळख

यावेळी विश्वजीत कदम म्हणाले की, जगभरातील अनेक देशांमध्ये महात्मा गांधी यांचे पुतळे आहे. त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक नतमस्तक होऊन प्रेरणा घेतो .पण आपल्याच राज्यातील संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल जे विधान केले आहे.त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा करून कारवाई केली पाहिजे,अशी मागणी यावेळी (Pune) त्यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.