Pune Water Supply : पुण्यात ‘या’ दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – पर्वती जलकेंद्राच्या पर्वती एल.एल.आर टाकीची मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनच्या नव्या जोडणी कामामुळे पाणीपुरवठा येत्या रविवारपासून (दि.16 जाने.) ते शुक्रवार पर्यंत (दि. 21) रात्री 10 ते पहाटे 3.30 पर्यंत बंद राहणार आहे.

पर्वती एल.एल.आर जलकेंद्र परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून सदर दिवसांत सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बाधित होणारा भाग – 

पर्वती एल.एल.आर जलकेंद्र परिसर – शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ येथील भागांना या संपुर्ण कालावधीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.