Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने ‘मनोमिलनाची आस’ आशयाचा लावला फ्लेक्स

एमपीसी न्यूज –   आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटची नियामक मंडळाच्या बैठकीचे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात (Pune) आले आहे.  या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहतील असे अपेक्षित होते .मात्र त्यांनी  दांडी मारली आहे. या बैठक ठिकाणाच्या बाहेर शरद पवार आणि अजित पवार यांना उद्देशून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अजित घुले यांनी लावलेल्या फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘लहान तोंडी आज घास मोठा घास, महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस…! ‘ अशा आशयाचा फ्लेक्स घुले यांनी लावला आहे.
या फ्लेक्स बाबत अजित घुले म्हणाले की, आपलं राज्य सुजलाम सुफलाम झाले पाहिजे. यासाठी आम्हाला साहेब आणि दादांनी एकत्रित आले पाहिजे. राष्ट्रवादी हा केवळ पक्ष नसून एक परिवार आणि जनतेशी बांधिलकी असणारा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाल्यास आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला चांगल्या पद्धतीने काम करता येईल. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांनी मनोमिलन करून हजारो कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी ,अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

2 जुलैच्या सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फू़ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आजही पचनी पडत नसल्याचे  दिसून येत आहे.  शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावे,अशी भावना अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते वारंवार बोलून दाखवत (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.