Pune : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी(Pune) हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी दोन वाजताच्या सुमारास हिंजवडी कासारसाई रस्त्यावर करण्यात आली.

सचिन ज्ञानदेव पवार (वय 19, रा. सणसवाडी, ता. शिरूर. मूळ रा. गेवराई, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार नरेश बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी कासारसाई (Pune)रस्त्यावर एक तरुण दुचाकीवरून आला असून त्याच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सचिन पवार याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस तसेच 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा ऐवजी जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.