Bhosari : संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनतर्फे पुणे झोन मधील भोसरी शाखेत (Bhosari)संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २४) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हे शिबीर संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी या ठिकाणी होणार आहे.

संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक भोसरी आणि दिघी परिसरात (Bhosari)घराघरामध्ये तसेच दत्तगड पायथा, मॅगझीन चौक, भोसरी चौक, स्पाईन सर्कल अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत.

Pimpri : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी

संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर, महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी मदत यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात. भोसरीचे संयोजक अंगद जाधव यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.