Dehuphata : उघड्या दरवाजावाटे 35 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात (Dehuphata) प्रवेश करून चोरट्यांनी 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) देहुफाटा येथील सनराईज रेसिडेन्सी मध्ये घडली.

हेमंत कुमार प्रभू निकोळे (वय 25, रा. देहुफाटा) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.