Pune : चंद्रकांत पाटील घेणार नगरसेवकांची आढावा बैठक; महापालिकेत भाजपची कामे होत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप

एमपीसी न्यूज – पुण्यातील भाजप नगरसेवकांच्या (Pune) समस्या सोडविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आढावा बैठक घेणार आहेत. सध्या पुणे महापालिकेत प्रशासक राज असल्याने विशेषतः भाजप नगरसेवकांनी कामे होत नसल्याची ओरड होत आहे. चंद्रकांत पाटील हे नगरसेवकांनी सुचविलेले प्रोजेक्ट यांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला मनपा आयुक्त, सर्व एचओडी उपस्थित राहणार आहेत. पक्ष म्हणून वॉर्ड वाईज या बैठका घेण्यात येणार असल्याचे पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. 

Maval : तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच मिळणार केंद्राची मंजुरी

तर, पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नगरसेवकांची कामे होतात. मात्र, भाजपच्या नगरसेवकांची कामे होत नाहीत. त्यामुळे (Pune) आम्ही निवडणुकीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे. दुसरीकडे शिवसेना नगरसेवक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून कामे करून घेतात. अजित पवार गटाचेही नगरसेवक आपली कामे करून घेण्यासाठी फोन करतात. त्या उलट भाजपचे 98 नगरसेवक असलेल्या पुणे महापालिकेत मोजक्याच पदाधिकाऱ्यांची कामे होत आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक होत होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.