Pune : ब्राझिल पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या सुकांत कदम याला विजेतेपद

एमपीसी न्यूज – निखील कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीच्या (एनकेबीए) व पुण्याच्या सुकांत कदम याने ब्राझिल पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय २०१८ स्पर्धेच्या पुरूष एकेरी गटामध्ये विजेतेपद मिळवले. सुकांतने दुहेरीमध्येही उपविजेतपद मिळवत गुणांची कमाई केली.

साओ पावलो येथे झालेल्या स्पर्धेत सुकांतने आपल्या गटाच्या अंतिम फेरीत भारताच्याच आनंद कुमार बोरगौडा याचा २१-१४, २१-१४ असा १८ मिनिटांमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत सुकांतने जर्मनीच्या आणि तिसर्‍या मानांकित टिम हॉलर २१-६, २१-१६ याचा असा सहज पराभव करून आगेकूच केली होती.
सुकांतने या वर्षात स्पेन आणि युगांडा येथील स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. हे त्याचे तिसरे आंतरराष्ट्रीय विजेतेपद ठरले. या विजयाच्या वाटचालीमध्ये सुकांतने एकही गेम गमावला नाही.

दुहेरीमध्ये कानेटकर स्पोर्टस् फाऊंडेशनचा पाठिंबा असणार्‍या सुकांतने जपानच्या डिसुके फ्युजिहारा हिच्या साथीत खेळताना अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली. अंतिम फेरीत या दोघांना जी. गिली व मॅथ्युइ थॉमस या फ्रान्स्च्या जोडीकडून २३-२५, २१-१६, १४-२१ असा पराभव स्विकारावा लागला.

आपल्या कामगिरीबाबत बोलताना सुकांत म्हणाल की, पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून खूप आनंद झाला आहे. थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत मला विजेतेपद मिळवता आले नव्हते पण, ब्राझिलची ही स्पर्धा फार समाधानकारक ठरली. एनकेबीए आणि केएसएफ या दोन्हींना मला सतत प्रोत्साहन आणि पाठींबा दिला, यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

सविस्तर निकालः
अंतिमः वि.वि. आनंद कुमार बोरगौडा (भारत) २१-१४, २१-१४; १८ मि;
उपांत्यः वि.वि. टिम हॉलर (जर्मनी, ३) २१-६, २१-१६;
उपांत्यपुर्वः वि.वि. पाबलो सेसर क्युटो (पर्शिया) २१-५, २१-१२;
गट अः वि.वि. निल्स् बोईनिंग (जर्मनी) २१-१४, २१-१९;
वि.वि. मॅक्सि्मिलानो सोसा (मेक्सिको) २१-८, २१-८;
वि.वि. क्लेटो इज्युनिओ (ब्राझिल) २१-९, २१-१३;
मिश्र दुहेरीः सुकांत आणि डिसुके फ्युजिहारा (जपान)
अंतिमः पराभूत वि. जी. गिली/मॅथ्युइ थॉमस (फ्रान्स्) २३-२५, २१-१६, १४-२१; ४५ मि.;
उपांत्यः वि.वि. पेड्रो पाबलो/पास्कल लापोइन्टे २१-१०, २१-१३;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.