Pune : पीएमपी बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरीला

पर्समधील तब्बल सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपी प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 26 एप्रिलला सकाळी पावणेदहा ते पावणेअकरा दरम्यान घडली.

या प्रकरणी एका 53 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्याप्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या दि. 26 एप्रिलला भोसरी ते कात्रज दरम्यान पीएमपी बसने प्रवास करीत होती. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला लावलेल्या पिशवीत छोट्या पर्समध्ये सोन्याचे दागिने, एटीएम कार्ड आणि रोख, 2 हजार 500 रुपये, असा एकूण दोन लाख 17 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पर्ससह चोरून नेला.खडकी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.