Pune: विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगून विद्यार्थिनीचा विनयभंग

एमपीसी न्यूज  – विद्यापीठात प्राध्यापक असल्याच्या बतावणीने (Pune) युवतीचा विनयभंग केल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. या प्रकरणी केतन कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात(Pune) फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी पीएमपी बसमधून गणेशखिंड रस्त्यावर उतरली. आचार्य आनंदऋषीजी चौकातून (विद्यापीठ चौक) ती रात्री आठच्या सुमारास विद्यापीठात निघाली होती. रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला कुलकर्णीने अडवले.

Pune – पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार, गोळ्या झाडून एकाचा खून

विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे त्याने तिला सांगितले. कुलकर्णीने तिला मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर कुलकर्णीने तिच्याशी असभ्य वर्तन केले. घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.