Andhra Pradesh: आंध्र प्रदेशामध्ये दोन ट्रेनचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू,32 जण जखमी

एमपीसी न्यूज : आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला.दोन(Andhra Pradesh) ट्रेन एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आहे. त्यामुळे रेल्वेचे तीन डबे घसरले. या भीषण रेल्वे अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 32 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

 

एएनआयच्या एजन्सीच्या वृत्तानुसार, विझियानगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी ट्रेन दुसऱ्या ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला.अलमांडा आणि कंटकपल्ले इथे हा अपघात घडला.

Pune – पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार, गोळ्या झाडून एकाचा खून
विजियानगरमच्या एसपी दीपिका यांनी (Andhra Pradesh)एएनआयला माहिती देताना सांगितलं की, या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 18 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखाहून रायगडाकडे जाणाऱ्या रेल्वेचे डबे कोठावलसा अलमंडा-कंटकपल्ली येथे रुळावरून घसरले. अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले असून मदत आणि बचावकार्य राबवण्यात येत आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले आहे. जखमीवर योग्य उपचार व्हावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दिले आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांकडुन मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.