Pune : तुझ्या तोंडात साखर पडो : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज – भाजपचे नेते चंद्रकांत पाटील जरी पुण्याचे (Pune) पालकमंत्री असले,तरी अजित पवारच पुण्याचे सुपर पालकमंत्री म्हणून काम पाहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.यासंदर्भात अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,तुझ्या तोंडात साखर पडो, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Sangvi : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव 2023 नियोजन बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या सह शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार घेऊन राज्यातील अनेक घडामोडी बाबत भाष्य देखील केले.

यावेळी अजित पवार म्हणाले की,मी जर बैठक घेतली, तर मला असं वाटतं की,मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम सातच दिवस राहणार आहे.त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात लगेच बैठक घेत असतो.पण काही लोकांना असं वाटतं की, त्यांनी घेतलेल्या बैठकांचा परिणाम एक ते दोन महिने राहणार आहे. त्यामुळे ते एक ते दोन महिन्यांनंतर बैठका घेतात अशा शब्दात अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.