Lonavala News : विकेंडमुळे लोणावळा परिसरात वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – विकेंडमुळे अनेक पर्यटकांनी लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांकडे धाव घेतली आहे, त्यामुळे लोणावळा परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी अनेकांना सुट्टी असते. आयटीयन्सना देखील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. त्यामुळे अनेकजण या दोन दिवसात बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. लोणावळा हे ठिकाण पुणे आणि मुंबई या दोन मेट्रो सिटीच्या जवळ असल्याने अनेकजण लोणावळा परिसरातील निसर्ग अनुभवण्यासाठी पसंती देतात.

या विकेंडला देखील पर्यटकांनी लोणावळा परिसरात गर्दी केली आहे. शनिवारी सकाळपासून लोणावळा शहर, कार्ला, लोहगड, पवना धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. यामुळे शनिवारी आणि रविवारी लोणावळा परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा शहरात, कार्ला मंदिराच्या पायथ्याशी असलेले वेहेरगाव ते कार्ला फाटा इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

लोणावळा शहर पोलीस, लोणावळा ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र येणा-या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने वाहनांच्या रांगा संपण्याचे नाव घेत नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.