Delhi News : शेतकरी आंदोलन तापले असताना राहुल गांधी सुट्टीसाठी इटलीला रवाना

एमपीसी न्यूज  : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे मोक्याच्या क्षणी परदेशात जाण्याच्या सवयीमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दिल्लीत  शेतकरी आंदोलन तापले असताना राहुल गांधी यांनी सुट्टी घालवण्यासाठी परदेशात जाणे अनेकांन रुचलेले नाही.

यावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी राहुल यांना लक्ष्य केले. राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले. 

राहुल गांधी हे रविवारी इटलीला रवाना झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काही दिवसांसाठी वैयक्तिक कारणासाठी परदेशात जात आहेत. परिणामी राहुल गांधी आज काँग्रेसच्या स्थापना दिवसालाही (Congress 136th foundation day) उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते तारिक अन्वर या बैठकीला हजर असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.