Pune : हडपसर येथे वेश्या व्यवसाय चालत असणा-या लॉजवर छापा; 6 पीडितांची सुटका; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सामाजिक सुरक्षा विभाग, गुहे शाखा यांनी हडपसर येथे वेश्या व्यवसाय चालत असणा-या लॉजवर छापा टाकून 6 पीडितांची सुटका केली. तर वेश्या व्यवसाय करवून घेणा-या तिघांना अटक केली. ही कारवाई आज सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

सुनील दत्तात्रय उबाळे (वय 32), सलमान मेहबुब (वय 22), शाम काशीनाथ सारणे (वय 31), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील यशराज लॉज येथे मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतले जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार लॉजवर छापा टाकून तेथील 6 पीडितांची सुटका करण्यात आली. तर तिघांना अटक करण्यात आली. तर पीडितांपैकी चार जणी प.बंगाल येथील असून त्यांच्याबाबत कोणते सेस्क्स रॅकेट आहे का याचा शोध घेण्यात येत आहे.

सन 2019 मध्ये सामाजिक सुरक्षा विभागाकडून पिटा अंतर्गत एकूण 38 गुन्हे दाखल करण्यात आले असून 116 पीडीत मुली त्यामध्ये 5 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.