Pune : रामदास स्वामींच्या पादुकांचे स्वामी समर्थ गोगवले मठात पुढील गुरुवारी आगमन

एमपीसी न्यूज – श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे श्री स्वामी समर्थ गोगावले मठ ४९ मंगळवार पेठ पुणे येथे पुढील गुरुवारी (दि.9) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दर्शनासाठी आगमन होणार आहे. 

सर्व भक्तांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा. सज्जन गड मठातर्फे भक्ताकडून कोरडा शिधा (डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, तेल इ.) भिक्षा स्वरुपात स्वीकारण्यात येईल, असे निवेदन प्रताप अनंत गोगावले उर्फ काका यांनी केले आहे, त्यांनी सर्व भक्तांना नूतन वर्ष शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.