Pune: श्री स्वामी समर्थ गोगावले मठात भक्तीमय वातावरणात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा

एमपीसी न्यूज- पुण्याच्या मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ गोगावले मठ येथे दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा तसेच प्रताप अनंत गोगावले रचित गुरुचरित्र पारायणाचा सांगता सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ गोगावले मठ येथे गेली 10 वर्षे श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री प्रताप अनंत गोगावले रचित गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या पारायणाचा काल (बुधवारी) शेवटचा दिवस होता.

प्रताप गोगावले परिवाराच्या मार्गदर्शनाखाली मठातील सेवेकऱ्यांनी मठात उत्कृष्ट सजावट केली होती. दरवर्षी सुमारे 150 स्वामीभक्त सकाळी 7 ते 10 दरम्यान पारायणासाठी मठात येतात. दरवर्षी प्रमाणे मठात गुरुचरित्र व पोथी वाचन या बरोबरच संध्याकाळी जन्म उत्सवानंतर पालखी सोहळाही संपन्न झाला. शेकडो भाविकांनी मठात दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.