​Lonavala : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी रमेशचंद्र नय्यर यांची फेरनिवड

सचिवपदी दत्तात्रय पाळेकर

एमपीसी न्यूज – लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी रमेशचंद्र नय्यर यांची तर सचिवपदी दत्तात्रय पाळेकर यांची फेरनिवड करण्यात आली. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त मंडळांची निवड नुकतीच बिनविरोध पार पडली.

नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे

रमेशचंद्र नय्यर (अध्यक्ष), गोपीचंद गुप्ता (उपाध्यक्ष), दत्तात्रय पाळेकर (सचिव), विजय दर्यानानी (खजिनदार), अॅड. नीलिमा खिरे (सल्लागार व विश्वस्त), एन. के. पत्रावाला, एन. जी. गुप्ता, बंकिमभाई मिठाईवाला, दत्तात्रय येवले, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार (विश्वस्त)

सदर विश्वस्त मंडळाची पुढील पाच वर्षाकरिता निवड झाली असून संस्थेच्या वतीने गेली ३६ वर्षे लोणावळा शहरात कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखाकरिता १०० टक्के शासकीय अनुदानीत महाविद्यालय चालविण्यात येत आहे या ठिकाणी  सुमारे २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या वर्षीपासून लोणावळा शहर व सर्व ग्रामीण परिसरातील विद्यार्थीनीकरिता सुसज्ज वसतिगृह सुरु होत असून काही व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने सुसज्ज अशी अद्यावत प्रयोगशाळांसह विज्ञान विभागाची इमारत बांधली असून भविष्यात नवीन इमारती व अद्यावत क्रीडा संकुल करणार असल्याचे सांगितले. सदर निवडीबद्दल लोणावळा शहर व परिसरातून नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडीबाबत अभिनंदन होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.