Bhosari : महिलेवर बलात्कार करुन आरोपी फरार

एमपीसी न्यूज – मारहाण व शिवीगाळ करून जबरदस्तीने शारीरीक संबंध केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकास पवार (वय 24, रा. उस्मानाबाद ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही गृहीणी असून आरोपी हा ड्रायव्हर आहे. आरोपीने महिलेला जबरदस्तीने लॉजवर नेऊन शिवीगाळ, मारहाण करत बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर आरोपी पळून गेला. पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.