Pune News : आमदार होताच रवींद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला

एमपीसी न्यूज : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत असलेला कसबा या मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला आहे. (Pune News) यात भाजपला मोठा धक्का बसला असून 28 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला आहे. कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आज खासदार गिरीश बापट यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप-मविआने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कसब्यात हजेरी लावली होती. अशातच, राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ खासदार गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सक्रिय झाले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही ऑक्सिजन सिलेंडरसह बापटांनी व्यासपीठावर हजेरी लावली. नाकात ऑक्सिजनची नळी असून गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशातही गिरीश बापट यांनी मेळाव्यात सहभागी होत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला होता.

IND vs AUS : दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिका बरोबरीत राखण्याची आशा ठेवली जिवंत

परंतु, यानंतर बापटांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावरुन विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.(Pune News) दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर त्यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकरांना 73 हजार 197 मते मिळाली आहेत. तर, भाजपच्या हेमंत रासनेंना 62 हजार 244 मते मिळाली आहेत. विजयानंतर धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. लोक नितीन गडकरी, शरद पवार यांना नमस्कार करतील. पणं, फडणवीसाचा पुढचा काळ चांगला नाहीय. फडणवीस कुरघोडीचे राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.