Weather Update : रत्नागिरी जिल्ह्यात रेड अर्लर्ट; मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये ऑरेंज अर्लर्ट 

एमपीसी न्यूज – रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जिल्ह्यात आज रेड अर्लर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये 12 ते 15 जुलै या चार दिवसांसाठी ऑरेंज अर्लर्ट जारी करण्यात आला आहे. 

कुलाबा येथील प्रादेशिक हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात आज (सोमवारी) रेड अर्लर्ट जारी केला आहे. तसेच, पुण्यात आज सोमवारी आणि मंगळवारी आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून घाट विभागात मूसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.