Pimpri : ब्लास्टिंगची डेन्सिटी कमी करा- अमित गोरखे यांची पालिकेकडे मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या समोरील  जमिनीवर सध्या महापालिकेच्या नवीन इमारतीचे खोदकाम चालू आहे. या खोदकामात वापरल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शेजारील एम्पायर स्क्वेअर या इमारतीच्या रहिवाशांना त्रास होत. त्यामुळे ब्लास्टिंगची डेन्सिटी कमी करण्याची मागणी भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी पालिकेकडे केली.

Pune : हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी सिम्बॉयसिस प्रशासनाने प्राध्यापक अशोक ढोले यांना केल निलंबित

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की,  ऑटो क्लस्टरच्या समोरील  जमिनीवर सध्या पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीचे खोदकाम चालू आहे. या खोदकामात वापरल्या जाणाऱ्या ब्लास्टिंग मुळे शेजारील एम्पायर स्क्वेअर या इमारतीच्या रहिवाशांना त्रास होत आहे.  या ब्लास्टिंगच्या हेवी डेन्सिटीमुळे इमारतीला तडे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या ब्लास्टिंगमुळे काही काचा तुटण्याचा प्रकार नुकताच घडला. तसेच सकाळी लवकर काम चालू होऊन रात्री उशिरापर्यंत चालत असल्याने त्या आवाजाचा त्रासही या इमारती धारकांना होत आहे.

या वेळी अमित गोरखे यांच्या सोबत एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील विनीत कदम, तुषार शिंदे ,संजय साळुंखे, विजय गुप्ता, झिशान खान, केतन पारख उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.