Republic Day Special : जाणून घ्या… ध्वजारोहण व ध्वज फडकवणे यातील फरक!

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन (Republic Day Special) आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामागची 10 कारणेही वेगळी आहेत. यामागची दहा महत्त्वाची कारणे आपण समजून घेऊया.

प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन हे दोन सर्वात महत्त्वाचे दिवस आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तसेच प्रजासत्ताक दिनी (Republic Day Special) भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो. पण हे दोन दिवस साजरे करण्याची पद्धत आणि नियम वेगळे आहेत. हे दोन दिवस वेगवेगळ्या नियमांनी कसे साजरे केले जातात ते जाणून घेऊया.

प्रजासत्ताक दिनी, देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती या कार्यक्रमात सामील होतात आणि ध्वजारोहण करतात. हे राष्ट्रीय राजधानीतील राजपथावर साजरे केले जाते. त्यानंतर परेड, राज्य टॅबलेक्स, तोफखाना प्रदर्शन हे कार्यक्रम होतात.

स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर समारंभ होतो आणि त्यावेळी पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात.

दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याचे नियम-

१) तिरंगा फडकवण्याच्या पद्धतीतही फरक आहे. 15 ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवला जातो.

२) 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण (Flag Hoisting) केले जाते.

३) प्रजासत्ताक दिनी (Republic Day Special) ध्वज शीर्षस्थानी बांधला जातो, तो तेथे उघडला जातो आणि फडकवला जातो.

४) प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकावला जातो, त्याला ध्वजारोहण म्हणत नाहीत. परंतु सर्वसाधारणपणे अनेकदा ध्वजारोहण शब्दप्रयोग केला जातो, जो चुकीचा आहे.

५) प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा फडकावतात.

६) स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात.

७) प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वज फडकवला जातो.

८) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.

९) राष्ट्रपती एक घटनात्मक पदावर असतात. आणि 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाली.

१०) पंतप्रधान राजकीय पदावर असतात.

प्रजासत्ताक दिनी (Republic Day Special) राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जातो. यामागचे कारण

म्हणजे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. या दिवशी देशाला पहिले पंतप्रधान लाभले.

देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.