Chakan : चाकण- खेड येथील रस्ते म्हणजे खड्डे व वाहतूक कोंडी – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – पावसाळा सुरु झाला की रत्यावर खड्डे, वाहतूक कोंडी असे असे सत्रच चाकण, खेड, चाकण चौक, तोच आपला आळंदी फाटा, तोच अंबेठाण चौक, चाकण (Chakan) तळेगाव रस्ता येथे पहायला मिळते. याला केवळ प्रशासन व जनप्रतिनिधीची उदासिनता आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांनी केला आहे.

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा अजित पवार यांचा निर्णय

अग्रवाल यांनी म्हटले आहे की, दरवर्षी पावसाने रस्त्यांचे हे हाल होत असल्याने लोकांना पण सवय झाली आहे. मागील पंधरा वर्षात फक्त आणि फक्त आश्वासने, जमिनीवर रस्ता रुंदीकरण नाही, उड्डाण पूल नाही, दरवर्षी ह्या दोन्ही रस्त्यावर किती लोकांचा जीव जातो पण लोकांच्या जीवाची किंमतच नाही.

मोर्चा, आंदोलन अनेक कारणासाठी होतात. पण रस्ता रुंदकरणासाठी किंवा उड्डाण पुलासाठी नाही. आमदार बदलले, खासदार बदलले. दर निवडणुकीनंतर वाटत आपला माणूस निवडून आला आहे. आत्ता सर्व अडचणी सुटतील, पण दर वर्षी अडचणी वाढतच आहे. निवडणूक गावकी भवकी वर निवडली जाते. विकासाचे मुद्दे कधीच चर्चाला येत नाही. किंबहुना तालुक्याचा विकास हा कधीच मुद्दा नसतो.

लोकांना ही तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची सवय झाली आहे. उद्योजक गुजरात आणि नागपूर ला जात आहे. दूरदृष्टी चा अभाव असलेले उदासीन जनप्रतिनिधी व प्रशासन. हे असच आहे आणि पुढे वीस वर्ष पण हे असेच असणार का? हे चित्र कधी बदलणार की नाही? बदल कोण घडवणार आणि कधी? असा सवाल देखील अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.